अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
पंढरपूर शहरातील अल्पवयीन शालेय मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याच्या घटनेचा जतमध्ये निषेध करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरातील अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीचे अपहरण करुन सतत अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे. ही घटना अतिशय निंदनीय आहे.या घटनेचा जत तालुका धनगर समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेतील आरोपी व त्या आरोपीला मदत करणाऱ्या इतरांना सहआरोपी करुन तात्काळ अटक करण्यात यावी व जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून तातडीने तपास पूर्ण करुन आरोपींना कठोर शासन करण्यात यावे,जेणेकरुन भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याबाबतचे निवेदन जतते तहसीलदार,पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
यावेळी जि.प.सदस्य सरदार पाटील, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे,अमित (बंटी) दुधाळ,संतोष मोटे,शिवाजी पडोळकर,रफीक शेख,नामदेव पुजारी,शहाजी वाघमोडे यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद