सभापती सौ.पुष्पाताई सरगर यांना राष्ट्रीय स्नेहबंध प्रेरणाज्योती पुरस्कार प्रदान

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सौ.पुष्पाताई जयवंतराव सरगर यांना स्व.हरिश्चंद्र गायकवाड बहुद्देशिय समाजसेवी संस्थेचा राष्ट्रीय स्नेहबंध प्रेरणाज्योती पुरस्कार २०२० प्रदान करण्यात आला.
सोलापूर येथे स्व.हरिश्चंद्र गायकवाड बहुद्देशिय समाजसेवी संस्थेचा राष्ट्रीय स्नेहबंध प्रेरणाज्योती पुरस्कार २०२० वितरण सोहळा पार पडला.
राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना राष्ट्रीय स्नेहबंध प्रेरणाज्योती पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सौ.पुष्पाताई जयवंतराव सरगर यांनी पदभार घेतल्यापासून आटपाडी तालुक्यात विकासकामांचा चांगला धडाका लावला आहे. तसेच आटपाडी तालुक्याचे नावलौकिक चांगल्याप्रकारे केल्यामुळे त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.