महिलांनी स्वावलंबी होऊन स्वतःचा आदर्श निर्माण करावा- उपजिल्हाधिकारी नूतन पाटील

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

ग्रामपंचायत कार्यालय आटपाडी येथे क्षितिज महिला ग्रामस‌ंघाची मासिक बैठक सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न आली.
या बैठकीला उपजिल्हाधिकारी नूतन नामदेव पाटील यांनी भेट देऊन उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले व मनात जिद्द असल्यास आपण काहीही होऊ शकतो असे सांगून सर्व महिलांनी स्वावलंबी होऊन स्वतःचा आदर्श निर्माण करावा, अशा प्रकारचे आवाहन केले. आटपाडी येथील क्षितिज महिला ग्रामसंघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. कु.नूतन पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल क्षितिज महिला ग्रामसंघातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
तसेच पाणी फाउंडेशनचे सुहास पाटील यांनी गांडुळ खत तयार करण्याबाबतची फिल्म दाखवून माहिती दिली. या बैठकीला क्षितीज महिला ग्रामस‌ंघाचे पदाधिकारी सौ.कविता गायकवाड,सुरेखा खरात ,रंजना चव्हाण,हिना इनामदार, सुनिता लांडगे, सुनिता पिंजारी, सविता ऐवळे सर्व सदस्य उपस्थित होते.