मांडकी आरोग्य केंद्रात लखलखाट!

आ.राम सातपुते यांनी दिला निधी!
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी आपल्या २०२०-२१ च्या आमदार फंडातून हायमस्ट दिवा उभा केल्याने मांडकी येथील आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थान प्रकाशमय झाले आहे.आता रात्रीच्या वेळी सर्वत्र या हायमास्ट दिव्यामुळे प्रकाश दिसत आहे.
सध्या कोरोनाची महामारी सुरु असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्वाचा झाला आहे. कोरोनाच्या काळात विविध तपासण्या,लसीकरण व अन्य प्राथमिक उपचारासाठी नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येत आहेत.याठिकाणी नागरिकांना उपचार,तपासणी,गोळ्या,औषधे मिळत आहेत.कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांची वर्दळ वाढली आहे.त्याठिकाणी विविध सुविधा देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे.याच लाभ नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे.
मांडकी गावापासुन बाहेर सुमारे १ कि.मी अंतरावर माळरानामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे व या आरोग्य केंद्राच्या समोरच आरोग्य कर्मचारी यांचे निवास व्यवस्थासुध्दा आहे.मात्र हे आरोग्य केंद्र गावापासून लांब असल्याने हा संपूर्ण परिसर रात्रीच्या वेळी अंधारमय दिसत होता.हीच बाब लक्षात घेत माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते यांनी आपल्या २०२०-२१ च्या आमदार फंडातून येथे हायमस्ट दिवा उभा केल्याने हे आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थान प्रकाशमय झाले आहे.आता रात्रीच्या वेळी सर्वत्र या हायमास्ट दिव्यामुळे प्रकाश दिसत आहे.
हे आरोग्य केंद्र माळारानामध्ये असले तरी याठिकाणी काही वर्षापूर्वी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे व सध्या माळशिरस तालुका अधिकारी म्हणून सेवा बजवीत असलेले डॉ.रामचंद्र मोहिते व येथील अधिकारी,कर्मचारी यांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने हा संपूर्ण परिसर झाडाने व फुलाने नटला असून यांची मोठ्या प्रमाणात निगा राखली गेली आहे.त्यामुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र रमणीय व निसर्गरम्य झाले आहे.त्यातच आता प्रकाशाची भर पडल्याने आरोग्य केंद्राची आणखीनच शोभा वाढली आहे.शासनाबरोबर लोकप्रतिनिधीच या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे असलेले लक्ष यामुळे येथील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.