अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका शारदाताई कुंभार यांनी महिलांसाठी दांडीया स्पर्धा भरवून महिलांना एकत्र आणण्याचे चांगले काम केले आहे,असे प्रतिपादन विक्रमसिंह दादा सावंत फाउंडेशनच्या संचालिका व आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या भगिनी सौ.मिनलदिदी सावंत (पाटील) यांनी केले.
त्या येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार युवा मंच यांच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या दांडीया स्पर्धा व लहान मुलांसाठी वेषभूषा स्पर्धानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सौभाग्यवती सौ.वर्षाताई सावंत होत्या.
याप्रसंगी बोलताना सौ.मीनलताई सावंत-पाटील म्हणाल्या की,महिलांनी दररोजच्या धकाधकीच्या वेळा व गृहीणीची जबाबदारी पार पाडत अशा सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे.सौ.शारदाताई कुंभार यांनी महिलांना अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन जगण्याचे बळ दिले आहे.
यावेळी बोलताना आमदार सौभाग्यवती सौ वर्षाताई सावंत म्हणाल्या की, चंद्रकांत कुंभार युवा मंचने हा चांगला उपक्रम महिलांसाठी राबविला आहे. यामुळे महिलांची करमणूक होत आहे.अशा कार्यक्रमांना महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माजी जि.प.सदस्या सौ.मिनाक्षीताई अक्की, नगरसेविका सौ.भारती जाधव, शिवनगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार,संतोष कुंभार,प्रसाद जेऊर, प्रविण जाधव,श्रीकृष्ण पाटील,इंजिनिअर शरणाप्पा अक्की, माजी नगरसेविका सौ.शारदा कुंभार, योगशिक्षिका सौ.अनुराधा संकपाळ, सौ.वनकुद्रे,आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाला जत विद्यानगर,शिवनगर, बसवेश्वर नगर, शिक्षक काॅलनी, चैतन्य नगर, कुंभार प्लाॅट येथील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम कुंभार, गौरी जेऊर, सौ.गिता वनकुद्रे,सौ.संपदा कुलकर्णी, श्री. सुभाष शिंदे यांनी केले.आभार च॔ंद्रकात कुंभार यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दांडीया स्पर्धा अध्यक्षा सौ.शारदा कुंभार व सहकारी महिला त्याचप्रमाणे प्रदिप कोळी,विजय शरण, हरिष चौगुले, संतोष कुंभार, संतोष अंगडी, राजू खडतरे, कुमार नागमोती,पवन कुंभार,ईमरान नदाफ,बबलू कोळी, सुनिल व्हनखंडे यांनी परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद