चांदूर बाजार व शिराळा येथे धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा

रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदूर बाजार(अमरावती) :

भारतीय बौद्ध महासभा कार्यकारणी चांदूर बाजार तसेच शिराळा बुध्दविहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
चांदूर बाजार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद बालोद्यान येथे सर्व भारतीय बौद्ध महासभाचे पदाधिकारी आणि उपासक,उपसिका यांनी डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ज्याप्रमाणे प्रबुद्ध समाज अपेक्षित होता व त्याकरिता त्यांनी भारतीय बौद्ध महासभा निर्माण केली, तोच धुरा सांभाळत चांदूर बाजार तालुक्यातील नवयुवक भारतीय बौद्ध महासभाची जबाबदरी सांभाळत धम्म गतिमान करण्यासाठी प्रत्येक गावात शाखा निर्माण करणे व त्याच गावात, विपश्यना शिबीर, उपासिका शिबीर,बाल संस्कार शिबीर,श्रमनेर शिबीर या प्रकारची २४ शिबीर राबवणे, भारतीय बौद्ध महासभाचे राजपत्रक धम्मयान मासिक सभासद गावागावात निर्माण करणे. घराघरात धम्मयान दिनदर्शिका पोहचवणे व धम्म गतिमान करण्यासाठी नवयुवक जोडणे,यासाठी संपूर्ण कार्यकारणी कार्य करणार आहे.
याच मंगलमय वातावरणात डॉ. मंगेश मनोहरे यांच्या स्पर्श फिजिओथेरपी सेंटरला सर्व पदाधिकारी यांनी भेट दिली व त्यांचे अभिनंदन केले.यावेळी उपस्थित अमरदिप गवई भा.बौ. महा. उपाध्यक्ष संरक्षण विभाग,सुभाष बागडे,सचिव,डॉ. मंगेश मनोहरे सचिव,सुबोध खडसे सचिव, बुद्ध भूषण तागडे,शहर अध्यक्ष,सचिन तायडे सचिव,पवन मनोहरे तालुका अध्यक्ष चोधरी व पदाधिकारी हजर होते.
शिराळा बुध्दविहारात धम्मचक्रपरिवर्तन दिन साजरा
अमरावती तालुक्यातील शिराळा येथील बुध्द विहारात धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर पंचशिल ध्वजारोहण वनराज मोहोड यांनी केले, सामुहिक बुद्धवंदना विशाल तायडे यांनी घेतली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्यर्पण माजी समाजकल्याण सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मिलिंद तायडे यांनी केले.यावेळी उपासक,उपासिका यांना अल्पोहार देण्यात आला.
अशोक सिरसाठ,नंदकुमार चिंचखेडे,डी.आर. वानखडे,मोहन तायडे,दिनेश तायडे,बाबाराव मेश्राम, अवधुत तायडे,अमोल मोहोड,अनिल मोहोड,अजय तायडे,सुमित वानखडे,योगेंद्र तायडे,अमित वानखडे, विरेंद्र वानखडे, स्वप्निल गजभिये,अंकुश तायडे,अजय मोहोड, नवल वाकोडे, जगन मोहोड,प्रशिक आठवले,सुभाष गजभिये, शकुंतलाबाई तायडे,सुनिता सुखदान,हर्षा मोहोड,चंद्रभागा इंगळे, शिला मोहोड,सुमनबाई मोहोड, वनमाला वानखडे,वैशाली मोहोड,सुशिला तेलमोरे,सुमेधा तेलमोरे, चित्रा मोहोड,सुर्यकांता वानखडे,आशा तायडे आदी उपस्थित होते.