मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या आटपाडी शाखेच्या वतीने मंगळवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता भव्य शिक्षक मेळावा व क्रांतीज्योती,क्रांतीसूर्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन व शिक्षक समितीचे मार्गदर्शक यु.टी. जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आटपाडी येथील दिघंची रोड,शेरेवाडी पाटी येथील साळुंखे मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून आमदार गोपीचंद पडळकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते विश्वनाथअण्णा मिरजकर कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत.
यावेळी समितीचे माजी तालुकाध्यक्ष शाम ऐवळे, माजी सरचिटणीस प्रवीण बाड, अध्यक्ष संजय कबीर,डॉ.आंबेडकर शाहू,फुले सह.रुग्णालयाचे संचालक श्रीकांत कुंभार, ज्येष्ठ नेते रमेश हेगडे,जिल्हा आदर्श शिक्षक हैबतराव पावणे व समितीचे तालुक्यातील पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
समितीचे माजी राज्य कार्याध्यक्ष किरणराव गायकवाड, राज्यसंघटक सयाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, जिल्हा सरचिटणीस दयानंद मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष सतिश पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष माणिक पाटील,पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष किसनराव पाटील,पार्लमेंटरी बोर्ड सचिव शशिकांत भागवत, शिक्षक बँक चेअरमन यु.टी.जाधव,शिक्षक बँक व्हा. चेअरमन राजाराम सावंत, डॉ.आंबेडकर शाहू,फुले सह. रुग्णालयाचे चेअरमन राजेंद्र कांबळे, व्हा. चेअरमन अजित पाटील व जिल्हा पदाधिकारी , शिक्षक बँकेचे सत्ताधारी संचालक मंडळ,सह . रुग्णालयाचे संचालक मंडळ,आटपाडी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य,पं.स.सभापती पुष्पाताई सरगर,उपसभापती दादासाहेब मरगळे व सर्व सदस्य पं.स.आटपाडी,गटविकास अधिकारी मनोज भोसले, गटशिक्षणाधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या उपस्थितीत आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने संपन्न होणार आहे.
२०१९ -२० व २०२०-२१ या सालातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी आटपाडी तालुक्यातील
१.श्रीमती जयश्री महादेव पाटील- जि.प.शाळा,दिघंची नं ३
२.श्रीमती पुष्पा किसन धुम -जि.प.शाळा कुरुंदवाडी
३. शितल पांडुरंग रास्ते- जि.प.शाळा हाकेवाडी व
४. शैलजा बापुसो औंधकर-जि.प.शाळा निंबवडे नं.२
यांची निवड झाली आहे.
नुतन महिला कार्यकारिणी निवड दिमाखात संपन्न होणार आहे.
आटपाडी तालुक्यातील १४ केंद्रांमधून १४ पुरुष शिक्षकांना क्रांतीसूर्य आदर्श शिक्षक पुरस्कार, १८ महिला शिक्षिकांना क्रांतीज्योती आदर्श शिक्षिका पुरस्कार, २ आदर्श माता-पिता पुरस्कार, जिल्हा परिषद गटातील ४ शाळांना व एका खाजगी शाळेला असे एकूण पाच सर्वांग सुंदर शाळा पुरस्कार, एक कलारत्न पुरस्कार, तीन साहित्यरत्न पुरस्कार तसेच नवोदय, सैनिक स्कूल, आयआयटीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
१ .आटपाडी केंद्र:
१.विद्या मोहन खिलारे जि .प .शाळा मापटेमळा २.कोमल किशोर दिवटे जि. प. शाळा प्रकाशवाडी नंबर २
३.रविंद्र राजाराम सावंत जि. प. शाळा शेगदारमळा
२. देशमुखवाडी केंद्र:
१.श्रीमती रंजना नामदेव बनसोडे जि. प. शाळा चव्हाणवस्ती
२. अमोल महादेव म्हमाने जि. प. शाळा बोंबेवाडी
३.विठलापूर केंद्र:
१.आशाताई विठ्ठल सावंत जि. प .शाळा लवटेवस्ती
२.सचिन नंदकुमार नामदास जि. प. शाळा साळशिंग मळा
४.गोमेवाडी केंद्र:
१. सविता दत्तू काटकर जि. प .शाळा गोमेवाडी
२.जावेद मुसा पठाण जि .प .शाळा दबडे रुपनरवस्ती ५.करगणी केंद्र:
१. पुनम गजानन शहाणे जि.प.शाळा करगणी नं.२
२.धम्मदीप संभाजी बनसोडे जि.प.शाळा बनपुरी नं.२
६ दिघंची केंद्र:
१.विद्या गंगाधर आव्हाड जि.प.शाळा फडतरेवाडी
२.काकासो बाळासो काटकर जि .प. शाळा दिघंची नंबर १
७.लिंगीवरे केंद्र:
१.रूपाली दत्तात्रय घोडके जि .प. शाळा राजेवाडी
२.लता सुधीर सुर्यवंशी जि.प. शाळा हनुमान धोंडा
३.विलास मारुती मोरे जि.प.शाळा काळामळा
८.निंबवडे केंद्र:
१.विजया उत्तम तारळेकर जि. प. शाळा निंबवडे नंबर २
२.रणजीत बाबासो गर्कळ जि .प. शाळा पिंजारीवस्ती
९.माडगुळे केंद्र :
१.मनीषा सचिन बेले जि.प.शाळा खानजोडवाडी
२.दत्तात्रय नाथा साठे जि.प. शाळा जेघाई
१०.नेलकरंजी केंद्र:
१. मोहिनी चंद्रकांत भोसले जि .प. शाळा कानकात्रेवाडी
२.रेवन्नाथ श्रीहरी गोडगे जि. प. शाळा तनपुरेवाडी
११.घरनिकी केंद्र:
१. कीर्तने गणेश महादेव जि .प .शाळा घाणंद
२. श्रीमती शिला नामदेव बनसोडे जि . प .शाळा ढगेमळा
१२.खरसुंडी केंद्र:
१.रवींद्र पोपट पिसे जि.प.शाळा चिंचाळे
२.स्वाती ज्ञानेश्वर ऐवळे जि.प.शाळा खरसुंडी नं.१
१३. झरे केंद्र:
१. सुमित्रा रामचंद्र डांगे जि .प .शाळा झरे
२.सचिन महादेव त्रिगुणे जि. प. शाळा बेंदवस्ती
१४. शेटफळे केंद्र:
१.वैशाली जगन्नाथ क्षीरसागर जि. प. शाळा गोंदिरापाटी
२.चंद्रशेखर व्यंकटेश गिरी जि.प.शाळा पाटीलमळा
कलारत्न पुरस्कार:
प्रमोद आबा देठे जि.प. शाळा निंबवडे नं. २
साहित्यरत्न पुरस्कार:
१. विजय पवार, झरे
२.जीवन सावंत, जि.प. शाळा कदमवाडी,गोमेवाडी
३.संतोष जगताप, लोणविरे ता. सांगोला
आदर्श माता-पिता पुरस्कार:
१.श्री.व सौ. सुमन हनमंत खोत जि .प .शाळा मापटेमळा
२. सौ.व श्री. प्रा.संभाजीराव शिवाजी पाटील, शेटफळे
सर्वांग सुंदर शाळा पुरस्कार :
१. जि.प प्राथमिक शाळा आटपाडी नं.१
२. जि .प .प्राथमिक शाळा शेटफळे नंबर २
३.जि. प . प्राथमिक शाळा दिघंची
४. जि.प. प्राथमिक शाळा खरसुंडी नं.१
५. इंदभाग्य आदर्श प्राथमिक विद्यालय, दिघंची
आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी सर्वांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद