प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/पुणे:
हिंदू शेगर समाज विकास मंच महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष रामदास येडेपाटील व सचिव प्रा.अजय गाढवे यांच्या संकल्पनेतून संघटनेच्या वतीने शेगर समाजातील विवाह इच्छुक वधू -वरांचा मेळावा झूम अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आयोजित केला. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भ, खानदेश सह मध्यप्रदेशातील शेकडो समाज बांधवांनी सहकुटुंब ऑनलाईन वधू वर मेळाव्यात सहभाग घेतला. यामध्ये १३० विवाह इच्छुक मुला-मुलींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधीक्षक कैलास गावडे व मनपा पुणेचे माजी उपआयुक्त हनुमंत नाझीरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिमूर तालुका अध्यक्षा सौ.उषाताई गावडे होत्या. तसेच प्रा.शिवलाल गावडे, आप्पासो रांधवण व भाऊसाहेब कर्पे यांनी मार्गदर्शन केले.
गेले दोन वर्षापासून संपूर्ण जगात कोरोना रोगराईचे संकट आहे.त्यामुळे इच्छा असूनही स्थळ पाहणीसाठी एकमेकांच्या घरी जाता येत नाही. त्यामुळे अनेकांचे विवाह लांबणीवर पडले आहेत.
आजच्या आधुनिक युगात समाजातील एकत्र कुटुंब पद्धती लोप पावून कुटुंब विभक्त होत चालली आहेत. समाजाची शैक्षणिक व सामाजिक प्रगती सुधारत असली तरी मात्र सामाजिक एकोपा व स्नेहभाव कमी होत आहे. त्यातूनच विवाह जुळणीसाठी अनेक समस्या निर्माण होत आहेत, समाजात इच्छुक वधू-वरांना योग्य,अनुरूप जोडीदार मिळावा यासाठी या वधू-वर सुचक मंडळाने ‘झुम अॅपवर’ आॅनलाईन मेळाव्याचे आयोजन केले होते.
गेले २ ते ३ वर्षापासून या संघटनेने हिंदू शेगर वधू वर सूचक 🕉️ ओम what’s App ग्रुपच्या माध्यमातून शेगर समाजबांधवांना एकत्र जोडून सामाजिक मदत करत आले आहेत. कोरोना काळातसुध्दा शेकडो विवाह जुळवून पार पाडले आहेत. यावेळी राज्यातील अनेक जिल्ह्यातील जवळपास १७५ कुटूंबांनी सहभाग नोंदविला.
कोरोना काळात जमावबंदी आदेश असल्याने ऑनलाईन परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे आजच्या धावपळीच्या युगात दैनंदिन जीवनातील वेळ व पैसा याची बचत होवून घरबसल्या सुरक्षित ठिकाणी राहून मेळाव्यात सहभाग घेता आला याचा आनंद समाजातील सर्व कुटुंबांना मिळाला.
आॅनलाईन मोफत मेळावा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रामदास येडे पाटील (इंदापूर), सचिव प्रा. अजय गाढवे (हवेली) यांच्यासह निलकंठ आटोळे(बुलढाणा), संभाजी साबळे (शिरूर), आर्चना बिबे (मालेगाव) नवनाथ खारतोडे, दिपकआबा गावडे(फलटण), दत्तात्रय पवार, अजित खोमणे( बारामती), अॅड. दादासाहेब मेरगळ, रांधवन, अक्षय गटकळ , आबासाहेब येडेपाटील (दौंड) , प्रा. सतिश पाटील ,अक्षय खोमणे( पुणे), बापूराव सांगळे, सचिन चवरे (इंदापूर ), स्वप्निल गावडे (करमाळा), डाॅ. संदीप आटूळे , शरद पवार (भूम- परंडा ), धनंजय हगारे , खटके सर,संभाजी मेरगळ (कर्जत ), भाऊसाहेब कर्पे ,राजेंद्र खर्से (अ. नगर),मनोज सांगळे (आष्टी ), संजय खोमणे (परळी वै.), मिंढ सर , प्रदीप खोमणे (लातूर),राजूदादा पवार , डाॅ. शाम आटोळे (जालना ), अशोक गाढे (अंबड), सतीश वाकडे (चिखली ),आप्पा आटोळे (देऊळगाव राजा),रामधनआटोळे (खामगाव ),छायाताई पाटील ( मालेगाव – नासिक ), तेजराव बिबे, रोहीदास शिंगाडे (वैजापूर ),भास्कर आटोळे (औरंगाबाद ) यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रामदास येडेपाटील यांनी केले. उपाध्यक्ष रामदास बिबे (कर्जत) यांनी आभार मानले. तसेच बायोडाटा वाचन संभाजी साबळे, तर सुत्रसंचालन सतिश शिंगाडे यांनी केले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद