मोटेवाडी येथे सिद्धनाथ विकास प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबीर संपन्न

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

मोटेवाडी येथे सिद्धनाथ विकास प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने नवरात्र उत्सव निमीत्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.माजी उपसरपंच सतीश मोटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
रक्तदान शिबीरामध्ये युवकांनी मोठा प्रतिसाद देऊन १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले .
यावेळी राजेंद्र मोटे, बिरुदेव मोटे , संतोष देवकते , सोमनाथ देवकते , नवनाथ देवकते , अर्जुन यमगर , दादा ठेंगल , राजेश वायदंडे , बापु देवकते , विठ्ठल पालवे , कुंडलिक खरात , दत्तू दडस , विठ्ठल वायदंडे , तानाजी खरात , सचिन केंगार , साजन रुपनवर , तानाजी कोळेकर ,अक्षय ब्लड बँक सोलापूर जनसंपर्क अधिकारी अजय रुपनर यांच्याकडून रक्त संकलनासाठी सहकार्य लाभले. तसेच कोरोणाचे नियम पाळून हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धनाथ विकास प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.