पोलीस ठाणे व पोलीस पाटील यांचा संयुक्त उपक्रम
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदूर बाजार(अमरावती) :
पोलीस स्टेशन पथ्रोट व त्याअंतर्गत गावातील पोलीस पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने वडनेर भुजंग येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.तसेच कोरोना योद्ध्यांचा शासकीय प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
रक्तदान शिबिरामध्ये ६० रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.याप्रसंगी रक्तदात्यांना एक रोपटे तसेच रक्तपेढी व पोलीस स्टेशनकडून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मदन जाधव तहसीलदार अचलपूर, पथ्रोट पोलिस स्टेशन ठाणेदार सचिन जाधव, राहुल उके पाटील जिल्हाध्यक्ष पोलीस पाटील संघटना, सरपंच योगिता विधळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे श्रीकृष्ण गोरडे, दीपक मोरे, तुषार कविटकर व आनंद चिठोरे यांचा तहसीलदार मदन जाधव यांच्या हस्ते शासकीय प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथून आलेल्या डॉ. अविनाश उकंडे, मनोज भाकरे, संगीता गायधने, प्रविण कळस्कर, मंगेश उमप, उमेश आगरकर, उमेर शेख व नितीन थोरात या रक्तपेढीतील सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पळसपगार यांनी केले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी ठाणेदार सचिन जाधव, नितीन गोरले पोलीस पाटील पथ्रोट, निलाकांत पुसदेकर पोलीस पाटील वडनेर भुजंग,अश्विनी बायस्कर पोलिस पाटील जवळापुर पोलीस कर्मचारी हेमंत येरवडे व प्रदीप भुरे पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद