माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी एकसंघपणे काम करु : कर्नल भगतसिंग देशमुख
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत तालुक्यातील माजी सैनिकांच्या ज्या समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी संघटना असणे गरजेचे आहे. कोणतेही कठीण काम सर्वांनी एकत्र येऊन केल्यास ते नक्कीच सार्थकी लागते.सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे व संघटनेला हातभार लावावा,असे मत महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळाचे अध्यक्ष कर्नल भगतसिंग देशमुख यांनी जत येथील एक्स सर्विसमेन वेलफेअर असोसिएशन संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता शिंदे म्हणाले की, तालुक्यातील माजी सैनिकांवर होणारे अत्याचार तसेच वीरमाता व वीरपत्नी यांच्यासाठी सहयोग करणे तसेच माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व संस्था वाढीसाठी एकसंघपणे काम करु,त्याचबरोबर सामाजिक कार्यही करु. त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
यावेळी सेवानिवृत्त सुभेदार मेजर (ऑन.कॅप्टन) बबनराव जगन्नाथ कोळी उपाध्यक्ष,सेवानिवृत्त हवालदार महेशकुमार वामन जगताप उपाध्यक्ष,सेवानिवृत्त हवालदार बाळासाहेब दादासाहेब भोसले सचिव,सेवानिवृत्त हवालदार विजय गोविंद पवार खजिनदार,सेवानिवृत्त हवालदार दत्तात्रय आकाराम शिंदे खजिनदार,सेवानिवृत्त सुभेदार मेजर (ऑन. कॅप्टन) विजय शिवाजी कुरणे सदस्य,सेवानिवृत्त ऑन.सुभेदार मेजर आकाराम गणपती बिसले सदस्य, सेवानिवृत्त ऑन.सुभेदार मेजर सिध्दु रामू गायकवाड सदस्य, सेवानिवृत्त ऑन. सुभेदार मेजर सतिश रंगराव शिंदे सदस्य, सेवानिवृत्त हवालदार दिपक आनंदा खांडेकर सदस्य यांचेसह एक्स सर्विसमेन वेलफेअर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व माजी सैनिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद