अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
बहुजन समाज पार्टी जत विधानसभा क्षेत्राच्या वतीने व्हसपेठ येथे बामसेफ व बहुजन समाज पार्टी यांच्या वतीने बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीरामजी यांना आदरांजली वाहण्यात आली.
सेक्टर अध्यक्ष सचिन झेंडे यांनी प्रास्ताविक केले. बसपाचे युवा नेते संतोष साबळे,विधानसभा संगठणमंत्री सदाशिव कांबळे, जत विधानसभा महासचिव शरद शिवशरण व शहराध्यक्ष सुनिल क्यातन यांनी कांशीरामजी यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना बसपाचे जिल्हा प्रभारी अतुल दादा कांबळे यांनी बहुजन नायक कांशीरामजी यांचा जीवन परिचय व त्यांनी केलेल्या कामांची माहिती दिली. उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बहुजन समाज पार्टीची माहिती दिली.
यावेळी विधानसभा कोषाध्यक्ष प्रशांत बाबर,जितेंद्र सुर्वे,संख सेक्टर अध्यक्ष हणमंत कांबळे,माडग्याळ सेक्टर विधानसभा सचिव अस्लम शेख,माडग्याळ सेक्टर मधील सर्व पदाधिकारी तसेच व्हसपेठ बुथचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद