
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /येडेमच्छिंद्र:
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त येडेमच्छिंद्र येथे ज्येष्ठांना विविध विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शनपर शिबीर संपन्न झाले.वाळवा तालुका विधी सेवा समिती, पंचायत समिती,इस्लामपूर,अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटना, सांगली व येडेमच्छिंद्र, ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला.इस्लामपूर येथील न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश जी.एस.दीवान प्रमुख पाहुणे होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास प्रमुख पाहुणे दिवाणी न्यायाधीश जी.एस.दीवान व ज्येष्ठ नागरिक विठ्ठल पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर मोरे यांनी केले.अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिकांचे जीवन गौरव अभियानाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी त्यांनी प्रत्येक ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून केंद्र शासनाने जाहीर करावी, अशी मागणी केली व ज्येष्ठांच्या विविध मागण्या मांडल्या.
तासगाव तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष व जिल्हा सचिव गजानन पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले.ज्येष्ठ नागरिक विठ्ठल पाटील यांचे ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्ती केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार दिवाणी न्यायाधीश दिवाण व ग्राहक पंचायतचे मार्गदर्शक बी.जी.पाटील यांच्या केला.इस्लामपूरचे सहाय्यक गट विकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांनी ज्येष्ठासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे न्यायाधीश जी.एस.दिवाण यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा या विषयावर ज्येष्ठांना मोफत विधी सेवा कोणत्या आहेत व त्याचा लाभ कशा पद्धतीने घ्यावा यासंबंधी मार्गदर्शन केले.
इस्लामपूरचे सहदिवाणी न्यायाधीश पी.एन.रोकडे यांनी पोटगी कायदेविषयक मार्गदर्शन केले. इस्लामपूर वकील संघटनेचे अध्यक्ष पी. टी. जाधव यांनी वारसा हक्क व सातबारा यासंदर्भात ज्येष्ठांना मार्गदर्शन केले.ज्येष्ठ वकील व जेष्ठ नागरिक संघटनेचे कायदेशीर सल्लागार के.एस.पाटील यांनी खरेदी पत्र संदर्भात ज्येष्ठांना खरेदीपत्र करताना घ्यावयाची काळजी व इतर बाबींचा खुलासा केला.नारायण सावंत यांनी आभार मानले.
शहाजी पाटील(बापू), सुबराव पाटील,जयसिंग पाटील,निवास खंडागळे, आर.एस.मोहिते सचिव अर्थक्रांती वाळवा तालुका जयसिंग यादव, सुभाष मारुती शिंदे, शंकर विष्णू पिसाळ, सुभराव राजाराम गावडे, अरुण प्रतापसिंग राजपूत, नंदकुमार कांबळे, दत्तात्रय पिसाळ, अशोक दबडे,गुलाबसिंग रजपूत, जालिंदर तुकाराम पाटील, विलास पाटील, शिवराम कुलकर्णी, दिनकर यादव, निवास शिंदे, राजाराम पवार ,बाळासो मदने, शहाजी पाटील, राजाराम दबडे,तानाजी विष्णू पाटील, सुभाष पाटोळे, तातोबा ज्ञानू हराळे, अशोक खराडे, तानाजी चव्हाण, दत्तात्रय माने भाई, सागर रणदिवे,रामचंद्र सुतार, नंदकुमार साळुंखे,सुभाष साळुंखे, अशोक पाटील, कृष्णा कोळेकर,अक्षय गोतपागर, अरुणसिंग राजपूत,निवास खंडागळे, हनुमंत पाटील, पैलवान आनंदराव जाधव, विठ्ठल पाटील, रामचंद्र सावंत, सुभाष पाटील, जयसिंग पाटील,विकास श्रीरंग पाटील, इत्यादी ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद