अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:
जत शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जागर फाऊंडेशनच्या वतीने डास प्रतिबंधक धूर फवारणीस सुरुवात करण्यात आली.यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष परशुराम मोरे,सामाजिक कार्यकर्ते कुमार साळे,युवा नेते अरूण साळे,विकास बन्नपटे,सिद्धेश्वर जाधव,बाळू कांबळे,पांडुरंग सुर्यवंशी व जागर फाऊंडेशनची टीम उपस्थित होती.
यावेळी बोलताना माजी बांधकाम सभापती तथा जागर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणाले की, कोरोनाच्या काळात फाऊंडेशनच्या मार्फत संपूर्ण जत शहर निर्जंतुकीकरण करण्यात आले.आता संपूर्ण जत शहरात डास प्रतिबंधक धूर फवारणी करणार आहे. याची सुरुवात प्रभाग क्रमांक १ पासून आज सुरू केली आहे.नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद