भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने उद्या पंढरपूर येथून सुरुवात
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
ओबीसींचे राजकीय आरक्षण व वेगवेगळ्या समस्यांसाठी भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने पंढरपूर येथून दि.९ ऑक्टोबर पासून महाराष्ट्रभर जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरपूर येथे सकाळी ११ वाजता तनपुरे महाराज मठ येथे जागर परिषद आयोजित केली आहे,अशी माहिती भाजपा ओबीसी मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष विलासराव काळेबाग यांनी दिली.
ते पुढे म्हणाले,या परिषदेसाठी माजी केंद्रीय मंत्री व ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज भैया आहीर,माजी मंत्री व ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्राचे प्रभारी आमदार संजय कुटे,ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार गोपीचंद पडळकर, संजय गाते, बापूसाहेब घडामोडे यांच्या उपस्थितीमध्ये जागर परिषदेचे आयोजन केले आहे.
काँग्रेस पक्षाने नेहमीच ओबीसी समाजावर अन्याय केला आहे.परंतु ओबीसी समाज आता सुज्ञ झालेला आहे. कोणाच्याही भूलथापांना बळी पडणार नाही.तो आपल्या मागण्या मान्य करूनच घेणार आहे.ओबीसी मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभर जागर परिषदेचे आयोजन केले आहे.त्याची सुरुवात विठ्ठलाचे आशीर्वाद घेऊन पंढरपूर येथून होणार आहे. तरी सर्व ओबीसीमधील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व ओबीसी एकजुटीचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला घडवावे, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आता शांत बसला तर कधीच आरक्षण मिळणार नाही, कायमस्वरूपी आरक्षणापासून वंचित राहू. आपणाला आपल्या हक्कासाठी जागर करावाच लागेल,तरच आपल्याला हक्क मिळतील.तरी सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाध्यक्ष विलासराव काळेबाग यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य, बाजार समिती सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध समाजाचे प्रतिनिधी बांधव यांनी जागर परिषदेला मोठ्या संख्येने तनपुरे महाराज मठ येथे सकाळी अकरा वाजता उपस्थित रहावे असेही त्यांनी आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन