
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /चांदूरबाजार (अमरावती ) :
अमरावती जिल्ह्यातील यावली शाहिद व शिराळा येथे स्वावलंबन दृष्टी समितीचे मार्गदर्शन करण्यात आले.
दृष्टी फाउंडेशन ग्रामीण भागामध्ये महिलांना सक्षमीकरणासाठी गेली २० वर्ष कार्यरत आहे. महिलांना उद्योग समुह तयार करण्यासाठी विदर्भात काम सुरु आहे. या कायद्यामध्ये ग्रामोद्योगांना चालना देण्यासाठी स्वावलबंन समितीची स्थापना करण्यात आली.
शिराळा व यावली शाहिद गावांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन दृष्टी सामाजिक संस्थेतर्फे ओम बनगीवार व अक्षय चौधरी यांनी केले होते. समितीवर दारे येणा-या काळात गावांमध्ये उद्योगधंद्यांना चालना देण्यात येणार आहे. दृष्टी फाउंडेशनतर्फे शिराळा व यावली गावात नुकतेच व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते.यामध्ये दृष्टी फाउंडेशन अमरावती विभाग प्रमुख सुधीर जैन,मयुर येवले,पंकज कापसे, मंगेश काळे,हर्षाली चुरे,राम किर्ती आदिंनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला यावली येथील वंदना वानखेडे,वर्षा भुरे,माधुरी वानखेडे,रामचंद्रांनी खांबलकर,श्रीखंडे काका,वाघमारे काका,मनोहरेताई, देशमुख सर,तसेच शिराळा येथे वैशाली मोहोड,रेखा मोहोड,निलीमा समरीत,सरिता खोब्रागडे,शुभांगी कडु, विठाबाई रघुते,अर्चना घोंगडे,योगिता सरोदे,नजमा काझी,पत्रकार डी.आर. वानखेडे,पंकज बोरकर आदींनी उपस्थित राहुन सहकार्य केले.संत तुकडोजी महाराज जन्मस्थान यावली शाहिद व शिराळा येथील ग्रामपंचायत सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद