गुणवंत महाराज पुण्यतिथी महोत्सव साध्या पद्धतीने साजरा

रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /चांदुरबाजार:

चांदुरबाजार तालुक्यातील क्षेत्र लाखनवाडी येथे संत गुणवंत महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला.
गेल्या दोन वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात कोरोना महामारीने विळखा घातला आहे.यात पूर्ण महाराष्ट्रातील मंदिरसुध्दा बंद आहे.यामुळे प्रशासनाच्या आदेशाचे पालन करुन संत गुणवंत महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला.
भावीक भक्ताची गर्दी होवू नये याकरीता शिरजगाव पोलिस स्टेशन यांनी चोख बंदोबस्त केला होता. करजगाव ते लाखनवाडी,तळेगाव ते लाखनवाडी,कवठा ते लाखनवाडी या रोडवर पोलीसांनी बॅरीकेट लावून वाहने व नागरिकांना जाण्यास मनाई केली.त्यामुळे भाविकभक्तांना संत गुणवंत महाराज यांचे दर्शन घेता आले नाही.