राजेवाडी जि.प.शाळेत म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

देवानंद जावीर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /राजेवाडी:

राजेवाडी येथील जि.प.शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.भाजपा नेते जयवंतराव सरगर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पांडुरंग कोडलकर यांनी नवोदय विद्यालय प्रवेश व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गावातील जास्तीत जास्त विद्यार्थी परिक्षेला बसावेत व यासाठी वह्या व पुस्तके खरेदी करु शकत नाहीत अशा पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी वीस हजार रुपयांची वह्या व पुस्तके दिली.
तसेच अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये पास झालेल्या मुला-मुलींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.जयवंतराव सरगर,सखाराम कुंभार गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक गुरव यांनी केले. हरीदास जावीर यांनी आभार मानले.या कार्यक्रमास सरपंच द्रोपदाबाई कोडलकर,पांडुरंग कोडलकर,सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमल घोडके,अजित सरतापे, माजी उपसरपंच संजय चांगण,अजित पुजारी,रावसाहेब खटके,तानाजी जरग,ग्रामसेवक आर.पी.रजपूत, मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.