अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत येथील दिवाणी न्यायालयात जत तालुका विधी सेवा समितीच्यावतीने २ ऑक्टोंबर रोजी गांधी जयंतीनिमित्त दि. २ ऑक्टोंबर ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेण्यात येणा-या ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या कार्यक्रमाची गांधी जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजनाने सुरुवात करण्यात आली.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांनी दिलेल्या निर्देशनाप्रमाणे हा कार्यक्रम राबवला जात आहे.
जत तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष ए. को. चौगले, सह दिवाणी न्यायाधीश ए. बी. जाधव, जत तालुका विधीज्ञ संघटनेचे अध्यक्ष आर. डी. कदम तसेच विधीज्ञ एस. बी. सौदागर व इतर विधीज्ञ व जत न्यायालयाचे कर्मचारी हजर होते.
या कार्यक्रमानिमित्त जत गावामध्ये दिवाणी न्यायालय जत येथून सकाळी प्रभातफेरी काढणेत आली.प्रभातफेरीत समितीचे अध्यक्ष ए. को. चौगले, सह दिवाणी न्यायाधीश ए. बी. जाधव, जत विधीज्ञ संघटनेचे अध्यक्ष आर. डी. कदम व इतर विधीज्ञ, दिवाणी न्यायालय जत येथील कर्मचारी व जत हायस्कूल जत, श्री राजे रामराव विद्यामंदीर व श्री राजेरामराव विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, जतचे पोलीस निरीक्षक डुबुले, उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद