संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:
माळशिरस येथील श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य योगेश गुजरे यांच्या हस्ते करण्यात आले.महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचा जीवन परिचय सांगितला.त्यांनी आपल्या देशासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला.प्रत्येकाने त्यांचे विचार आचारणात आणले पाहिजेत असे म्हणाले.
नेहरु युवा केंद्राचे माळशिरस तालुका समन्वयक मोहिनी वाघमोडे यांच्यामार्फत कोरोना जनजागृती व स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपन करण्यात आले.
यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद