अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत तहसिल कार्यालयात चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
जतचे नूतन तहसिलदार जीवन बनसोडे यांचा सत्कार श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्यावतीने तुकाराम बाबा महाराज यांनी वृक्ष भेट देवून केला. त्यानंतर तहसिल आवारात नूतन तहसिलदार जीवन बनसोडे यांच्या उपस्थितीत वृक्षरोपन करण्यात आले. यावेळी जतचे मंडळ अधिकारी संदीप मोरे, रामपूरचे माजी सरपंच मारुती पवार, कोतवाल सुभाष कोळी, संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे रूपेश पिसाळ, सागर मोरे, रोहित मोरे, बिराप्पा मोरे, राजू वाघमोड़े, कुमार इंगवले, अशोक स्वामी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की, कोरोनाच्या या कठीण काळात आपणास ऑक्सिजनचे महत्व कळले आहे. तेव्हा प्रत्येकांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाला महत्व दिले पाहिजे. शासन व प्रशासनाने यासाठी गावपातळीवर लोकसहभागातून मोहीम राबवावी, असे आवाहन केले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद