
विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून एका गुणवंत विद्यार्थ्यापाठीमागे प्रत्येकी 51 हजार रुपयांचे बक्षीस!
देवानंद जावीर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/राजेवाडी:
नवोदयसारख्या केंद्रीय संलग्न विद्यालयात अथवा सैनिक स्कूलमध्ये एका विद्यार्थ्याचा प्रवेश होण्यासाठी प्रयत्न केला गेल्यास रुपये 51 हजार इतकी रक्कम/ साहित्य शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांचे हस्ते मानपत्रासह शिक्षकाला प्रोत्साहन म्हणून देण्याचा क्रांतिकारी निर्णय दि.२२ सप्टेंबर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांच्या १३४ व्या जयंती निमित्त राजेवाडी गावच्या ग्रामस्थांनी घेतला.
कार्यक्रमाची सुरूवात कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा आणि शिक्षणमुर्ती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि.प.शाळा राजेवाडीचे शिक्षक अशोक गुरव यांनी केले.या क्रांतीकारी निर्णयाची संकल्पना राजेवाडी गावचे सुपुत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता पोपटराव वाघमारे यांनी सर्व ग्रामस्थांनुमते मांडली.ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होण्यासाठी सातारा येथील बांधकाम व्यावसायिक इंजिनिअर बाळासाहेब शिरकांडे, रयत शिक्षण संस्थेचे अद्यापक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शहाजी डोंगरे तसेच विद्याभवन घाटकोपर या संस्थेचे माजी प्राचार्य. कृष्णाजी शिरकांडे, इंजिनीयर बळीराम शिरकांडे,बीडीएस बँकेचे चेअरमन बाळासाहेब पाटील, युवा उद्योजक सुभाष सातपुते,मोहन कोडलकर,पोलिस उपनिरीक्षक रवींद्र खांडेकर,सखाराम कुंभार,नामदेव पुजारी,विष्णू शिरकांडे,अण्णा पाटील, तुकाराम नांदुगडे,माजी मुख्याध्यापक आबा शिरकांडे, दादा शिरकांडे, वसंत शिरकांडे,शालेय शिक्षण समितीचे चेअरमन नवनाथ पुजारी, व्हा.चेअरमन आनंत शिरकांडे, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन रवींद्र शिरकांडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य कार्यकारणी प्रमुख उमाजी चव्हाण,अजित सरतापे,तानाजी जरग,राहुल पुजारी,संजय नांदूगडे, विलास साबळे, तसेच गावातील इतर युवा पिढीने कार्यतत्पर राहण्याची वज्रमूठ बांधली.
यावेळी प्रा.शहाजी डोंगरे यांनी कर्मवीर अण्णांच्या शिक्षण चळवळीच्या जीवन संघर्षावर प्रकाशझोत टाकला.उपस्थित शिक्षक व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले.
इंजिनीयर बाळासाहेब शिरकांडे यांनी मार्गदर्शन करताना शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून देण्यात येणाऱ्या रुपये ५१ हजार रुपये या रकमेची घोषणा केली.तसेच बापू शिरकांडे यांनी ते कार्यरत असलेल्या मुंबई येथील ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील मदतीची माहिती दिली आणि या हाती घेतलेल्या उपक्रमासाठी त्यांनी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
राज्यात प्रथमच असा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला असल्यामुळे शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे गावातून जास्तीत जास्त उत्तोत्तम गुणवंत विद्यार्थी घडावे,गावात शिक्षण क्षेत्रात क्रांती होण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्नशील राहू, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.राजेवाडी गावाला शैक्षणिक पंढरी करू असा ध्यास राजेवाडीकरांनी घेतला आहे. जि.प.शाळा राजेवाडी गावच्या शिक्षक प्रतिनिधी अक्काताई हेगडे यांनी या उपक्रमासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,असे प्रतिपादन केले.
उपक्रमासाठी लागेल ते सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन राजेवाडी गावचे तरुण उद्योजक सुभाष सातपुते व पांडुरंग कोडलकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी राजेवाडी गावच्या सरपंच द्रोपदाबाई कोडलकर,उपसरपंच सुरेश शिरकांडे, प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक ,ग्रामसेवक, सेवानिवृत्त शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, विविध क्षेत्रातील निवृत्त अधिकारी, माजी सैनिक , ग्रामस्थ उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थितांचे आभार जि.प.शाळा राजेवाडीचे मुख्याध्यापक अशोक राऊत यांनी मानले .

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद