येळवीच्या अष्टविनायक ग्रुपकडून ‘भगिनी निवेदिता’ला मदत!

गणेशोत्सवाच्या अनावश्यक खर्चाला फाटा, अविनाश पोरे यांचा उपक्रम
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत येथील विना अनुदानित तत्वावर चालणाऱ्या भगिनी निवेदितामध्ये सध्या २२ मुली राहतात.या मुलींना मदतीची गरज असल्याचे समजताच तालुक्यातील येळवी येथील श्रीमंत अष्टविनायक गणेश मंडळ व फ्रेंड्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पोरे व सदस्यांनी भगिनी निवेदिताला भेट देवून त्यांना मदतीचा हात दिला.
जत येथील ‘भगिनी निवेदिता’ ही अनाथ,निराधार मुलींना आधार देणारी संस्था आहे.या संस्थेला तूर्त शासनाचे अनुदान मिळत नाही.जत येथील सामाजिक कार्यकर्ते परशुराम मोरे,योगेश मक, अमोल कुलकर्णी, भागवत काटकर,निलेश माने यांनी मदतीचे आवाहन केले होते.त्यांच्या या आवाहनाला श्रीमंत अष्टविनायक गणेश मंडळ व फ्रेंड्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पोरे व सदस्यांनी मदतीचा हात देण्याचा संकल्प केला.यंदा गणेशोत्सव साजरा न करता भगिनी निवेदिता येथील मुलींना जीवनवश्यक किटचे वाटप केले.
यावेळी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज,रासपचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील,सामाजिक कार्यकर्ते योगेश मोटे, श्रीमंत अष्टविनायक गणेश मंडळ व फ्रेंड्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पोरे, नितिन पोतदार, संतोष पोरे, सागर कोळी, दिपक चव्हाण ,बापू चव्हाण, रमेश चव्हाण, नागेश शिंदे , विनायक तोडकर, संकेत गाममोटे, संतोष जमदाडे,ज्ञानेश्वर माने उपस्थित होते.

मुली दत्तक घेणार- तुकाराम बाबा अष्टविनायक ग्रुप व अविनाश पोरे यांचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत भगिनी निवेदिता येथील मुलींच्या शिक्षणासाठी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना कटिबद्ध असून या मुली दत्तक घेवून त्यांना मदत करणार असल्याचे चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती,श्री संत  बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा  तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी बोलताना सांगितले.

रासपच्या माध्यमातून करणार मदत- अजित पाटील। अष्टविनायक ग्रुप व अविनाश पोरे यांचा आदर्श समाजाने घ्यावा,असे आवाहन करून रासपचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील म्हणाले की, राज्याचे माजी मंत्री,रासपचे सर्वेसर्वा आ.महादेव जानकर यांच्या फंडातून, रासपच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे सांगितले.

अविनाश वस्त्र निकेतनच्या माध्यमातून मदत करणार- अविनाश पोरे
भगिनी निवेदिता येथील मुलींना ड्रेस व शालेय साहित्यांची आवश्यकता असल्याचे येथे भेट दिल्यानंतर निदर्शनास आले आहे.समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याची गरज आहे.भगिनी निवेदिता येथील या मुलींना अविनाश वस्त्र निकेतनच्या माध्यमातून मदतीचा हात देणार असल्याचे अविनाश वस्त्र निकेतनचे मालक,श्रीमंत अष्टविनायक गणेश मंडळ व फ्रेंड्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पोरे यांनी यावेळी सांगितले.