
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी :
आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथे बळीराजा फाउंडेशन,भारतीय किसान मोर्चा आटपाडी तालुका व लायन्स नेत्र रुग्णालय,सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ यांनी दिली.
सार्वजनिक नवतरुण गणेश मंडळ,जांभुळणी यांच्यातर्फे गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे.जांभुळणी व परिसरातील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा व कोरोणाच्या नियमांचे पालन करून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बळीराजा फाउंडेशनच्या जयश्री झंजे,सर्जेराव चव्हाण,रमेश मलमे,शरद मासाळ यांनी नियोजन केले आहे.
सार्वजनिक नवतरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष महेश झंजे,वैभव वाघिरे,नवाज मुलानी,नाना उकसे,योगेश वाघिरे,आण्णासो पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून डॉ.उमेश पुजारी,जांभुळणीचे माजी सरपंच प्रल्हाद माने,भारतीय किसान मोर्चाचे आटपाडी तालुका अध्यक्ष शरद झंजे,युवा नेते श्रीकांत गावडे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
शिबीरात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी गुरुवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय जांभुळणी येथे उपस्थित रहावे. येताना शिधापत्रिका झेरॉक्स व आधारकार्ड सोबत आणावे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद