


घेतली स्वच्छता शपथ!
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंचायत समिती आटपाडी येथे स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत २ तास पंचायत समिती परिसर स्वच्छ करून श्रमदान करण्यात आले. तसेच स्वच्छता शपथ घेण्यात आली.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ.पुष्पाताई जयवंतराव सरगर, गट विकास अधिकारी मनोज भोसले,सहायक गट विकास अधिकारी सचिन भोसले, प्रशांत चंदनशिवे,समग्र शिक्षा अभियान व पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख,अधिकारी व कर्मचारी वर्ग श्रमदानसाठी उपस्थित होते.
यावेळी सभापती सौ.पुष्पाताई जयवंतराव सरगर यांनी आज सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतींना दरवर्षी १०० तास म्हणजेच आठवड्यातून २ तास श्रमदान करण्यासाठी आवाहन केले.
आटपाडी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक म्हेत्रे यांनी लिंगीवरे येथे स्वच्छतेसंदर्भात गावासह प्राथमिक व माध्यमिक शाळांना भेटी देऊन श्रमदानासह स्वच्छतेत भाग घेण्यास सांगितले व मार्गदर्शन केले.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद