
साफसफाईची मागणी
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /चांदूर बाजार (अमरावती):
चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला येथे अतिवृष्टी पावसामुळे गावातील नाले घाणीने तुडुंब भरले आहेत.गावात सर्वत्र घाण,कचरा, चिखल पसरल्यामुळे गावात साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे.गावातील साफसफाई करून जंतुनाशक फवारणी करण्यात यावी,जेणेकरून नागरिकांना साथीचे आजार जसे डेंग्यू,मलेरिया, टायफाईड यासारखे आजार होणार नाहीत व गावाची सुरक्षा अबाधीत राहिल.लवकरात लवकर गावातील सर्व साफसफाई व जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात यावी अशी गावातील नागरिकांची व देवेंद्र भोंडे यांची मागणी आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद