

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:
आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रम सन २०२१-२२ अंतर्गत आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते जत ग्रामीण रुग्णालय जत येथे ३१ जम्बो सिलेंडर क्षमतेचे ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार सांवत म्हणाले की, पहिल्या व दुसऱ्या लाटेत तालुक्यात ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे काही रुग्णांची गैरसोय झाली होती. तालुक्यात ऑक्सीजन प्लांटची व्यवस्था नसल्याने रुग्णांना तालुक्यापासून शंभर किलोमीटरवर असणाऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे. आता तालुक्यात कोरोना रुग्णालये,ऑक्सीजन प्लँटची व्यवस्था असल्याने तिसरी लाट आलीच तर मोठ्या ताकतीने कोरोनाचा सामना करू,असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे, डि.वाय.एस.पी.रत्नाकर नवले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर, डॉ.इरकर, क्लार्क सानप, माजी सरपंच मारुती पवार, माजी नगरसेवक निलेश बामणे, माजी उपसरपंच दिलीप सोलापुरे सावकार, आकाश बनसोडे,युवक नेते राजू यादव, आप्पू माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर