

पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना;भाऊ बचावला
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:
जत तालुक्यातील उमदी येथे ओढ्यात खेळण्यासाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणीचा पाण्याचा अंदाज न आल्याने घराशेजारी असणाऱ्या ओढ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. कु.रेणुका शिवानंद ऐवळे (वय -7) व कु.लक्ष्मी शिवानंद ऐवळे (वय-8) या दोन्ही सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर त्याच्या सोबतच गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे (वय 6) हा मात्र सुदैवाने बचावला गेला.
याबाबत अधिक माहिती अशी की, ऐवळे कुटुंबिय हे काही दिवसापासून उमदी गावात ओढ्यालगत असणाऱ्या आपल्या घरात रहात होते. शिवानंद ऐवाळे हे मैलमजूर करुन आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.आज रविवारी सकाळी घरातील सर्व लोक दुसऱ्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. घरात दोन मुली व एक मुलगा यांना घरात सोडले होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आंघोळ करण्यासाठी दोन्ही बहीणी व एक भाऊ असे तिघे मिळुन ओढापात्रात आंघोळी करण्यासाठी गेले.परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने रेणुका शिवानंद ऐवळे (वय-7) व लक्ष्मी शिवानंद ऐवळे (वय-8) या दोन्ही सख्ख्या बहीणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचवेळी त्यांच्या सोबतच गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे (वय-6) याने दोन्ही बहीणीला पाण्यात बुडताना पाहून आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. त्यावेळी ओढ्यालगत जनावरे राखणारा संभाजी माने यांनी मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारून बाहेर काढले. परंतु दुर्दैवाने मुलींचा मृत्यू झाला होता. त्यामुळे उमदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या