
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /बारामती:
बारामती येथील शशिकांत खरात यांच्या वडिलांच्या कॅन्सरच्या आजारावर उपचाराच्या बहाण्याने फसवणूक केल्याप्रकरणी उंदरगाव येथील मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याला काल पोलिसांनी पकडले होते.त्याला आज बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी ए.जे.गिऱ्हे यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
बारामती शहरातील कसबा येथील शशिकांत खरात यांच्या वडीलांना कॅन्सर हा आजार झाला होता.मनोहर भोसले याने कॅन्सर बरा करण्याच्या बहाण्याने २ लाख, ५१ हजार रुपये घेतले.याबाबत शशिकांत खरात यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मनोहरमामासह ओंकार शिंदे आणि विशाल वाघमारे यांच्यावर फसवणूक आणि जादू टोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोहरमामाचा शोध सुरु केला होता.पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकानेही मनोहरमामावर पाळत ठेवली होती. शुक्रवारी दुपारी मनोहरमामाला सातारा जिल्ह्यातील लोणंदनजीकच्या सालपे येथील एका फार्म हाऊसवरुन ताब्यात घेत अटक करण्यात आली.
आज सकाळी मनोहरमामाला बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी पोलिस कोठडीची मागणी केली.त्यानुसार न्यायालयाने मनोहरमामाला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या