

दुकानाचे शटर उचकटून ६ लाख,२० हजाराचा ऐवज लंपास
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
माळशिरस येथे म्हसवड रोडला दुकानाचे शटर उचकटून ६ लाख, २० हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली.
माळशिरस शहरात पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर माळशिरस-म्हसवड रोडलगत कुलकर्णीवस्ती आहे.सन्मती सुकुमार दोशी यांचे येथे दुकान व घर एकत्र आहे.मंगळवार दि. ७ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता ते ८ सप्टेंबर पहाटे चार या दरम्यान येथे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून राहत्या घरामध्ये प्रवेश करुन बारा तोळे सोने,सव्वा किलो चांदी,नव्वद हजार रुपये रोख असा एकूण सहा लाख वीस हजार रुपयेचा ऐवज चोरुन नेला.चोरीची तक्रार सन्मती सुकुमार दोशी यांनी माळशिरस पोलिस ठाण्यात दिली.याचा तपास माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या