
कोंतेवबोबलाद येथील तलाठ्याचा अपघातात मृत्यू, एक जखमी
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
जत तालुक्यातील कोंतेवबोबलाद या ठिकाणी कार्यरत असणारे गावकामगार तलाठी दिपक जगन्नाथ ठाकरे (वय २८) यांचा दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की,जत तालुक्यातील कोंतेवबोबलाद या ठिकाणी दिपक जगन्नाथ ठाकरे (वय २८ सध्या रा. जत, मूळ गाव धुळे) हे तलाठी म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळी ११ वा.च्या दरम्यान हे आपल्या भागात जात असताना दुचाकीचा समोरासमोर अपघात होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे.अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या