
शिवाजी ओलेकर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कवठेमहांकाळ:
कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एस येथील जुन्या काळातील घटनांच्या साक्षीदार जनाबाई हंबीरराव ओलेकर यांचा १२० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जनाआज्जी नावानं सर्वत्र परिचित असलेल्या या आज्जींचा जन्म १९०१ साली झाला.जत तालुक्यातील उमराणी गाव आज्जीचे माहेर.वयाच्या चौदाव्या वर्षी आज्जींचा विवाह अलकुड एस येथील सरकार घराण्यातील हंबीरराव ओलेकर या उमद्या तरुणाशी झाला व उमराणी गावची लेक अलकुड एस येथील ओलेकर सरकार घराण्याची सून झाली. जनाआज्जीला दोन मुलं-एक मुलगा व एक मुलगी.पण आज्जीचे दुर्दैव मुलगा अचानक तरुणपणातच मृत्यू पावला.आज्जी खचून गेली नाही. मुलगी धोंडूबाई हिलाच मुलगा मानून आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे गेली. परंपरागत असलेल्या जमिनीत मुलीला मदतीला घेवुन शेती केली, पण कुणाच्याही दारात मदतीसाठी याचना केली नाही.२० वर्षापूर्वी पती हंबीरराव ओलेकरसुद्धा वृद्धापकाळाने निधन पावले.अशी अनेक संकटे आज्जीने पचवली. पण आज्जींनी धीर सोडला नाही.आज्जींनी इंग्रज सरकार व नंतर मिळालेले स्वातंत्र्य पाहिले.गांधीजींच्या अनेक ऐकीव गोष्टी आजही त्यांना आठवतात. अशा जनाआज्जींचा वाढदिवस त्यांचा नातू तानाजी पाटील याने मोठ्या उत्साहात साजरा केला.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद