दिव्यांगमित्र भरत जोशी यांच्या कोरोनावरील ब्रेल पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई:
दिव्यांगमित्र भरत जोशी यांनी कोरोनासारख्या ज्वलंत विषयावर अंध बांधवासाठी ‘कोरोना विषाणू कोविड -१९ बिमारी और इलाज’ या पुस्तकाचे प्रकाशन राजभवनात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह को्श्यारी यांच्या हस्ते झाले.
या ब्रेल पुस्तकात कोरोना – कोविड १९ची शास्त्रीय माहिती , लक्षणे ,कोरोनाचा फैलाव कसा होतो आणि तो कसा कमी करावा,तसेच नियमित व्यायाम ,लसीकरण,मास्क,सामाजिक अंतर आणि सॅनिटायझेशन यावर सविस्तर माहिती दिलेली आहे.
राज्यपालांनी दिव्यांगमित्र ब्रेल पुस्तकाचे लेखक भरत जोशी यांचे कौतुक करताना प्रशंसनीय उदगार काढले आणि या त्यांच्या अव्दितीय सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.या ब्रेलपुस्तक प्रकाशन कार्यक्रमात दिव्यांगाचा आणि दिव्यांगाना मदत करणाऱ्या १० डोळस व्यक्तींचा भेटवस्तू आणि सेवाव्रती सन्मानपत्र राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
दिव्यांगमित्र, सर्पमित्र भरत जोशी हे महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईडचे जिल्हा आयुक्त असून स्काऊटचा उद्देश अपंग – अंध यांची सेवा करणे हा असून या सामाजिक जाणिवेतून त्यांनी आतापर्यंत २१ ब्रेल पुस्तकांची निर्मिती केली असून महाराष्ट्र राज्यातील १०० अंध शाळांना विनामूल्य पाठविण्यात आली.इच्छुकांनी अधिक माहितीसाठी दिव्यांगमित्र श्री.भरत जोशी मो. क्र.9221580888 किंवा ई.मेल – bharatjoshi.jtc@gmail.com वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.