
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिखलगी भुयार येथे श्री संत सयाजी बागडेबाबा यांचा पुण्यतिथी सोहळा साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती,श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी दिली.
दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री संत बागडेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते.पण मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे पुण्यतिथी साध्या पद्धतीने साजरी करण्यात येते.यंदाही साध्या पद्धतीने पुण्यतिथी साजरी करण्यात येणार असल्याचे सांगून तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले की,पाच सप्टेंबर रोजी पुण्यतिथी निमित्त विणा उभारण्यात आला आहे.१२ सप्टेंबरपर्यत पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मठात होणार आहे.१२ सप्टेंबरला १२ वाजता फुले टाकण्याचा कार्यक्रम होणार आहे.हे सर्व कार्यक्रम मठातील ठराविक भाविकांच्या उपस्थितीत सर्व नियमांचे पालन करत होणार आहे.
यंदाही पुण्यतिथीनिमित्य भाविकांनी मठात गर्दी करू नये,असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद