आज ‘इतके’ पॉझिटिव्ह तर ‘एवढे’ कोरोनामुक्त !

आटपाडी तालुका : कोरोनायन दि.०८ सप्टेंबर,२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि. ०८ सप्टेंबर रोजी नव्याने ४८ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर ३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुरुष पॉझिटिव्ह : २६
स्त्री पॉझिटिव्ह : २२
आटपाडी तालुक्यातील :४५
आटपाडी तालुक्याबाहेरील : ०३

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
गावनिहाय पॉझिटिव्ह संख्या :

आटपाडी १२
चिंचाळे १
दिघंची ३
गळवेवाडी २
पारेकरवाडी १
पळसखेल १
पिंपरी खुर्द २
पिसेवाडी १
पुजारवाडी(आ) २
शेटफळे १
तडवळे २
यपावाडी १
आंबेवाडी १
जांभुळणी १
मापटेमळा २
पुजारवाडी (दि) ३
राजेवाडी ३
उंबरगाव ४
विठ्ठलापूर १
शेरेवाडी १
चोपडी २
खवासपूर १