
माळशिरस येथील प्रभाग १० मधील नगरसेवकांचा उपक्रम
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सावानिमित्त डॉ.आप्पासाहेब देशमुख सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नगरपंचायतीच्या प्रभाग १० मधील अर्चनाताई देशमुख यांच्या संकल्पनेतून घरोघरी पोहोचून १ रुपयात ईको फ्रेंडली गणेशमूर्ती देण्याचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. घरगुती गणेश व पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रोत्साहन म्हणून नावनोंदणी मोहीम हाती घेतल्याची माहिती डॉ.आप्पासाहेब देशमुख यांनी दिली.
कोरोनामुळे सार्वजनिक गणेशउत्सवावर गंडांतर आले आहे.कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन करीत घरगुती गणेशउत्सवावर भर देण्याच्या दृष्टीने एक ते दिड फुटाची ईको फ्रेंडली गणेश मूर्ती नाममात्र १ रुपयांमध्ये दिली जाणार आहे.यासाठी नावनोंदणी केली जाणार आहे. या मूर्ती घरगुती पद्धतीने विसर्जीत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यासाठी प्राचार्य योगेश गुजरे (9545798598), गणेश कुलकर्णी(9730737310),धनाजी देवकर(99600 02009), महेंद्र उंडाळे(9028919005) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद