
नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माडगुळे:
माडगुळे येथे आद्यक्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांची २३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
स्वातंत्र्याची,स्वराज्याची धगधगती ज्योत मनात ठेवून स्वातंत्र्य लढ्यातील पहिला उठाव स्वतः स्थापन केलेल्या, छोट्या सैन्याच्या मदतीने इंग्रज सरकार विरुद्ध बंड पुकारणारे,छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणून इंग्रजांना मेटाकुटीला आणणारे नरवीर उमाजी नाईक यांची जयंती आज माडगूळे येथे साजरी करण्यात आली.
माडगुळे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सौ.संगीता गवळी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.नरवीर उमाजी नाईक चौकात असणाऱ्या प्रतिमेचे पूजन माडगुळे गावचे पोलीस पाटील वसंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच सौ.संगीता गवळी,उपसरपंच विशाल झोडगे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक विश्वजीत देशमुख,माजी सरपंच संजय विभुते,उत्तमराव मंडले, ग्रामसेवक मोरे,बापूसाहेब विभुते,पश्चिम महाराष्ट्र वाघ्या मुरळी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष बजरंग वाघमारे,ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उद्धव विभुते, तालूका केडरचे माजी चेअरमन मोहनराव विभुते, ,ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुरेश झोडगे,राजू मलमे,मंगेश मलमे,शरद मंडले,प्रगतशील बागायतदार सुनील ह.विभुते,हॉटेल सयाजीराजेचे सचिन कंडरे, जितेंद्र विभुते,रणजीत विभुते,पवन विभुते आदी मान्यवर उपस्थित होते.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद