गोरडवाडीत बचतगटाच्या वर्धापन दिनानिमित्त स्मशानभूमीत वृक्षारोपन

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथे महिला विकास महामंडळ (मविम) सोलापूर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मैत्री लोकसंचलीत साधन केंद्र,पिलीव व अहिल्यादेवी स्वयं सहाय्यता महिला बचत गट गोरडवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्मशानभूमी येथे बचत गटाच्या अध्यक्ष जिजाबाई गोरड व सचिव अश्विनी गोरड तसेच लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक आबासाहेब कोळेकर,ऑरगॅनिक CC सुदर्शन सानप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
अहिल्यादेवी स्वयं सहाय्यता महिला बचत गट गोरडवाडी यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त स्मशानभूमी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.कारण सध्या कोरोनामध्ये पेशंटसाठी ऑक्सिजनची कमतरता होती. झाड ऑक्सिजन देते.तसेच वृक्षारोपन हे शाळेच्या पटांगणामध्ये किंवा मंदिर परिसरामध्ये बऱ्यापैकी वृक्षारोपण केले जाते. म्हणून स्मशानभूमी येथे वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम घेतला.या कार्यक्रमासाठी गावातील १२ बचत गटातील अध्यक्ष सचिव यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते.कोरोनाचे जगावर संकट असल्यामुळे या कार्यक्रमासाठी प्रत्येक गटातील दोन महिला उपस्थित होत्या.
यावेळी मैत्री लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक आबासाहेब कोळेकर,ऑरगॅनिक CC सुदर्शन सानप व क्षेत्र समन्वयक वैशाली क्षिरसागर,सरपंंच बाळासाहेब गोरड,पत्रकार संजय हुलगे यांंनी कार्यक्रमाला आलेल्या उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले .
यावेळी CLF लेखापाल रामचंद्र वाघमारे,VO लेखापाल रणजित कांबळे, क्षेत्र समन्वयक वैशाली क्षिरसागर, कोमल मगर,CRP उज्वला गोरड,सरपंच बाळासाहेब गोरड,ग्रामपंचायत सदस्य विजय गोरड, रामराव गोरड,बाळासो गोरड,शिवाजी गोरड,माऊली हुलगे,तानाजी गोरड,हनुमंत गोरड,नाना गोरड,महादेव गोरड,संदिपान गोरड,धुळा गोरड,उत्तम गोरड,बापु गोरड सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व गटातील सर्व सदस्य तसेच अहिल्यादेवी स्वयं सहाय्यता महिला बचत गटानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन शिवाजी गोरड यांनी केले तर आभार तानाजी गोरड यांनी मानले.