जतमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा उतरवला विमा

जय मल्हार फाऊंडेशन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)यांचा उपक्रम
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जय मल्हार फाऊंडेशन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)यांच्या वतीने जत तालुक्यातील बचत गटामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा उतरविण्यात आला.
यावेळी आरपीआयचे सांगली जिल्हा अध्यक्ष संजयराव कांबळे , सांगली जि.प. सदस्य सरदार पाटील, शिवसेना संघटक अमित(बंटी) दुधाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना संजय कांबळे यांनी जय मल्हार संस्थेचे चेअरमन हेमंत चौगुले यांच्या कामाचे कौतुक करत महिला सक्षमीकरण करणारी ,महिलांना पाठबळ देणारी संस्था असा उल्लेख केला.येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना प्रा. हेमंत चौगुले यांच्यामार्फत जत तालुक्यातील महिलांसाठी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली.
सरदार पाटील यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या आजवरच्या कामाची प्रसंसा केली.जिल्हा परिषदेच्या सर्व योजना हेमंत चौगुले हे आपल्या तालुक्यात राबवत असून महिला सक्षमीकरण करणारी एकमेव संस्था असा उल्लेख आपल्या भाषणात केला. शिवसेना नेते अमित दुधाळ व बंटी नदाफ यांनी हेमंत चौगुले यांच्या कामाचे कौतुक केले.चौगुले सर हे कोणताही गाजावाजा न करता शासनाच्या सर्व योजना तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
यावेळी जत तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुभाष कांबळे,सामाजिक कार्यकर्ते बंटी नदाफ , न्यू दत्त क्लासेस चे संचालक भोसले, विनोद दादा कांबळे, युवक राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक् अशोक कोळी ,बँकेचे प्रतिनिधी व बचतगटांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.