

कण्हेर येथील मोटार चोरांना म्हसवड येथे पकडले
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:
म्हसवड जवळील ढाकणी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शेतकऱ्यांच्या विहिरीतील विद्युत मोटारी चोरणारी कण्हेर येथील चौघांची टोळी ग्रामस्थांनी पकडली.चोरट्यांना ग्रामस्थांनी चांगलाच चोप देत म्हसवड पोलिसांच्या स्वाधीन केले.यामध्ये विठ्ठल श्रीमंत बोडरे,आबा किसन सरगर,बाजीराव रामचंद्र चव्हाण,उमाजी विलास बुधावले अशी पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या चोरांची नावे आहेत.
माण तालुक्यामध्ये काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारी चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत होता.त्यातच शनिवारी म्हसवड परिसरात ढाकणीमध्ये अशाचप्रकारे विद्युत मोटारी चोरणारी टोळी ग्रामस्थांच्या हाती लागली. त्यामुळे ग्रामस्थांनी या चोरट्यांना बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील ढाकणे या गावातील बाबा खाडे यांची ढाकणे गावामध्ये विहीर आहे.त्या विहिरीवर त्यांनी तीन अश्वशक्तीची विद्युत पानबुडी मोटर बसवली आहे.ते शनिवारी नेहमीप्रमाणे शेतीतील कामे आटपून घरी गेले.त्याचदिवशी रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर ढाकणी ग्रामस्थाने फोन करून सांगितले की,तुमच्या विहिरीवरील पानबुडी मोटर चोरण्यासाठी आलेल्या चारजणांना आम्ही ताब्यात घेतले आहे. तुम्ही लवकर या असा फोन आल्याने बाबा खाडे व त्यांची दोन मुले व शेजारी बारीकराव शिंदे असे सर्वजण त्या ठिकाणी पोचले. त्याठिकाणी त्यांना आणखी गावातील दहा ते बारा जण ओळखीचे दिसले. त्या सर्वांनी बाबा खाडे यांनी सांगितले की, आमच्यापैकी काहीजण तुमच्या विहिरीकडून येत असताना दोन लोक विहिरीच्या कडेला उभे दिसले. ते लोक अनोळखी असल्याने त्यांच्याविषयी ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी फोन करून गावातील इतरांना त्या ठिकाणी बोलून घेतले. त्या सर्वांनी बाबा खाडे यांच्या विहिरीवर जाऊन पाहिले असता आणखी दोघेजण विहिरीमध्ये उतरून पाणबुडी सोडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले. ग्रामस्थांना पाहून यापैकी वरील दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पाठलाग करून ग्रामस्थांनी पकडले. तर विहिरीमध्ये असलेल्यांना बाहेर बोलावले.त्यांच्याकडे ग्रामस्थांनी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी त्यांना बेदम चोप देत म्हसवड पोलिसांच्या ताब्यात दिले.म्हसवड पोलिसांनी ताब्यात घेत यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी विठ्ठल श्रीमंत बोडरे,आबा किसन सरगर, बाजीराव रामचंद्र चव्हाण,उमाजी विलास बुधावले (सर्व रा.कण्हेर इस्लामपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) अशी नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन दुचाकी,दोन करवत,विळा,दोरी असा मुद्देमाल जप्त करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बाबा खाडे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या