शिराळ्यातील शेतकऱ्याची आत्महत्या !

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/अमरावती :
अमरावती तालुक्यातील शिराळा येथील अल्पभूधारक शेतकरी विजय शामरावजी अर्मळ यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली.
मृत शेतकरी यांनी कर्ज काढून ट्रॅक्टर घेतला होता.पंरतु ट्रॅक्टरचे कर्ज भरु न शकले नाहीत. त्यामुळे कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेला.याचा धसका घेवून विजय अर्मळ यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.
कुंटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. शिवाय उत्पनाचे साधन असलेला ट्रॅक्टर कंपनीने ओढून नेला.विषेश म्हणजे यांचेकडे दोन एकरच शेत आहे. कमावता माणूस गेल्यामुळे कुंटूंब निराधार झाले आहे.शासनाने दखल घेवून मदत करावी,अशी आत्महत्याग्रस्त शेतकरी विजय अर्मळ यांच्या पत्नीने मागणी केली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.