

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
सांगली जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी जतचे आमदार विक्रम सावंत यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसशी एकनिष्ठ,मंत्री विश्वजीत कदम यांचे निकटवर्ती असलेले आ.सांवत यांचे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी गेल्या महिन्यापासून चर्चेत होते. जिल्हाध्यक्ष पदाचा मान जत तालुक्याला सांवत यांच्या रुपाने प्रथम मिळाला आहे.जत तालुक्याचा काँग्रेसचा गड त्यांनी गत विधानसभा निवडणूकीत पुन्हा ताब्यात घेतला आहे.जिल्ह्यातील राजकारणात त्यांचा दबदबा यानिमित्ताने कायम राहणार हे निश्चित झाले आहे.
जिल्हाध्यक्ष पदासाठी विशाल पाटील यांचेही नाव चर्चेत होते.मात्र राज्यातील नेत्यांनी मंत्री विश्वजीत कदम यांचे मावस बन्धू असलेले आ.विक्रमसिंह सांवत यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची सांगली जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष पद मिळताच जत शहरासह तालुक्यातील काँग्रेसप्रेमी लोकांनी आनंदोत्सव साजरा केला.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन