

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ लोणी काळभोर:
पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वारास पुढे जाण्यास जागा न दिल्याने दुचाकीस्वारासह त्याच्या साथीदारांनी धावत्या एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना पुणे-सोलापूर मार्गावर सोरतापवाडी येथे घडली. एसटी बसचालकालाही मारहाण केली.याबाबत बसचालक रवींद्र शिंदे (वय ३८, रा.चिवर ता. तुळजापूर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एसटी बस चालक रवींद्र शिंदे पुणे-सोलापूर या मार्गाने तुळजापूरकडे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एसटी बस घेऊन निघाले होते. सोरतापवाडी परिसरात बस आली असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वारास पुढे जाण्यासाठी जागा न दिल्याने दुचाकीस्वाराने एसटी बस थांबवण्याचा इशारा केला. दुचाकीस्वार आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी बसचालक शिंदे यांना शिवीगाळ केली. एसटी बसच्या काचेवर दगडफेक केली. शिंदे यांच्या डोक्यात दगड फेकून मारला व मारहाण करून दुचाकीस्वार व त्याचे साथीदार तेथून पसार झाले. याबाबतची फिर्याद बसचालकाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या