आज २२ पॉझिटिव्ह, ३४ कोरोनामुक्त !

आटपाडी तालुका : कोरोनायन दि.२६/०८/२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि. २६ ऑगस्ट रोजी नव्याने २२ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये १६ पुरुष असून ६ स्त्रियांचा समावेश आहे.यापैकी आटपाडी तालुक्यातील २२ व तालुक्याबाहेरील ० व्यक्तींचा समावेश आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.२६ ऑगस्ट,२०२१)

आटपाडी ४
बनपुरी १
देशमुखवाडी ४
दिघंची १
गळवेवाडी १
हिवतड १
जांभुळणी १
निंबवडे ३
पुजारवाडी (आ) १
शेटफळे १
उंबरगाव ३
यपावाडी १