

पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने नग्नावस्थेत बसवत होता बनावट पूजेला!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ नाशिक:
पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने एका परप्रांतीय भोंदूबाबाने २७ वर्षीय तरुणीला नग्नावस्थेत पूजेला बसवून तिच्यावर अत्याचार करीत वारंवार बलात्कार केल्याची घटना नाशिक येथे घडली. ही घटना उघडकीस येताच गंगापूर पोलिसांनी भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
पैशाच्या मोहापायी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात.नाशिकमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने एका २७ वर्षीय पीडित तरुणीला परप्रांतीय भोंदूबाबाने बनावट पूजा मांडून तिच्यावर वारंवार बलात्कार केला.नग्नावस्थेत पूजेला बसवून तिच्यावर अत्याचार केला.
कामील हुलाम यासीन शेख असे या परप्रांतीय भोंदूबाबा आरोपीचे नाव आहे. गंगापूर गावातील पठाडे गल्ली येथे पत्र्याच्या खोलीत हा भोंदूबाबा राहत होता.त्याने आपले दोन साथीदार स्टॅलिस्टिंग उर्फ शिवराम जेम्स फर्नांडिस आणि अशोक भुजबळ या दोन साथीदारांच्या मदतीने पीडितेवर अत्याचार केला आहे. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत मागील सहा ते सात महिन्यांपासून असा प्रकार करीत होता.
आरोपी साथीदार हे पीडितेच्या पतीचे मित्र आहेत. या दोघांनी पीडित महिलेशी संपर्क साधत पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले होते.त्यानंतर ती या आरोपींच्या जाळ्यात अडकली. पैशांच्या लोभापायी तीने आरोपींनी सांगितलेली सर्व अघोरी कृत्ये करायला सुरुवात केली. पैशाचा पाऊस पाडायचा असेल तर पूजेला नग्नावस्थेत बसावे लागेल, अशी अट संशयित आरोपींनी तिला घातली होती.यानंतर आरोपी भोंदूबाबाने स्वतः आपल्या हाताने कपडे काढून तिला नग्नावस्थेत पूजेला बसवले. तिच्यावर वारंवार अत्याचार केला. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.यानंतर संबंधित महिलेने आरोपीविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या