पिलीव घाटात वाटसरुस लुटले, पण साहेबांनी थेट गोव्यावरुन येतानाच गाठले!

पिलीव घाटात मोटार सायकलस्वरास लुटणा-या आरोपीस पोलिसांनी केल ७२ तासात जेरबंद
सुळेवाडी घाटातील घटना,माळशिरस पोलिसांची कामगिरी
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

म्हसवड-पिलीव रोडवडील सुळेवाडी घाटामध्ये एका मोटार सायकलस्वरास जखमी करून त्याच्याकडील रोख रक्कम व ऐवज लंपास झाल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबतची फिर्याद विशाल बाळासाहेब फाळके (वय २३) यांनी माळशिरस पोलिसात दिली होती.
या गुन्ह्याचा तपास करणेसाठी माळशिरस, म्हसवड, वेळापूर या सर्व पोलीस ठाणेतील हद्दीतील गावामध्ये गोपिनीय माहिती संकलित केल्यानंतर हा गुन्हा शेरी नं. २ वेळापूर ता.माळशिरस येथील दोन आरोपीने केला असल्याची माहिती मिळाली.ही महिती मिळताच आरोपीचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या तपास पथकाने वेळापूर परिसरात वेशांतर करून गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती घेतली. या गुन्ह्यातील आरोपी हा गोवा येथे फिरण्यासाठी गेला असल्याचे समजले.लागलीच तपास पथकाने आदेश घेऊन गोवा येथे जाण्यास निघाले असता त्यांना आरोपी हे गोव्याहून परत निघाल्याची माहिती मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा पोलीस ठाणेकडील पोलिसांच्या मदतीने सापळा लावून आरोपीस आजरा येथे पकडले.तर दुस-या आरोपीस वेळापूर येथून ताब्यात घेण्यात आले.या आरोपींकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केलेचे कबूल करून एक कापडी सॅक,मनगटी घड्याळ,हेडफोन गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व गुन्ह्यातील हत्यार लोखंडी पाईप असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपीकडे चोरीच्या दोन मोटार सायकली मिळून आल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू,पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके,पोलीस नाईक राहुल वाघ,मारुती शिंदे,पोलीस दत्ता खरात,सोमनाथ माने,अन्वर आत्तार यांनी केली.