
माळेवाडी येथे कंटेनरने दुचाकीला मागून दिली धडक
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
अकलूज – वेळापूर रस्त्यावरील माळेवाडी येथे मालवाहतूक करणारा कंटेनर आणि दुचाकी वाहनाच्या भीषण अपघातात वेळापुर येथील आई छाया पांडुरंग दांडगे (वय ४५ रा.वेळापूर ) आजारी असल्याने आपली बहीण सृष्टी पांडुरंग दांडगे (वय १८) या मायलेकीचा जागीच मृत्यू झाला.दोघी जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची नोंद अकलुज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत अकलुज पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओंकार पांडुरंग दांडगे (वय २० रा.वेळापूर) हा आई छाया पांडुरंग दांडगे (वय ४५ रा.वेळापूर) आजारी असल्याने आपली बहीण सृष्टी पांडुरंग दांडगे (वय १८ रा. वेळापूर) हिच्यासोबत दुचाकी क्र. MH 01 AS 2370 वरून अकलूज येथील दवाखान्यात उपचारासाठी जात होता. माळेवाडी येथील प्राथमिक शाळेजवळ मागून येणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर क्र. KA 01 AH 5951 ने जोरदार धडक दिली. यामध्ये छाया दांडगे व सृष्टी दांडगे यांचा जागीच मृत्यू झाला. तर ओंकार दांडगे हा गंभीर जखमी झाला.त्याच्यावर अकलुज येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
याबाबत विनोद राजकुमार पवार रा.वेळापूर यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दिली असून कंटेनर चालक शिवशंकर हाजी बसप्पा (वय ४३ रा.नामकल तामिळनाडू ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड करीत आहेत.
अपघात एवढा भीषण होता की, कंटेनरखाली गेलेल्या मायलेकी जवळपास १०० मीटर आंतरापर्यंत फरफटत गेल्या.त्यामुळे मृतदेहाच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या होत्या.रस्त्यावर रक्ताचा सडा व मृतदेहाचे तुकडे पसरले होते.दरम्यान अपघातानंतर परिसारातील व स्थानिक लोकांची बघण्यासाठी प्रचंड गर्दी जमल्याने काहीकाळ अकलुज – वेळापुर मार्गावरील वाहतूक खोळंबळी होती. अकलूज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत करुन जखमीस उपचारासाठी हालवले. मृतदेह शवविच्छदन करण्यासाठी ताब्यात घेतले.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या