
पिंपरी-चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड.नितीन लांडगे यांच्यासह चौघे अॅन्टी करप्शनच्या ‘जाळ्यात’
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/पिपरी :
मंजूर झालेल्या टेंडरची वर्कऑर्डर काढण्याकरिता 9 लाख रूपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्टॅडीग कमीटीचे चेअरमन नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लांडगे यांच्यासह त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे , लिपिक अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे. मंजूर झालेल्या टेंडरची वर्कऑर्डर काढण्याकरिता लाच रक्कम मागितली होती.
पुणे अॅन्टी करप्शनचे अधीक्षक राजेश बनसोडे आणि अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांनी सध्या कारवाई सुरू असल्याचं सांगितलं आहे. मात्र,पुणे अॅन्टी करप्शनने 9 लाख रूपयांच्या लाच प्रकरणी पिंपरी – चिंचवड महापालिकेत मोठी कारवाई केली आहे.
9 लाख रुपयांचे लाच प्रकरण असल्याने आणि थेट मोठा मासा गळाला लागल्याने पिंपरी – चिंचवड आणि पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.संबंधित व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे .
अॅन्टी करप्शनचे पथक पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत ठाण मांडून बसले आहे. कारवाई सुरू आहे.अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे या लिपिकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.9 लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती.
2 लाख रूपये पीएमार्फत स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे स्टँडींग कमीटीचे चेअरमन नितीन ज्ञानेश्वर लांडगे , त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे , मनपा मधील लिपीक अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती अॅन्टी करप्शनकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या