
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
प्राथमिक आरोग्य केंद्र वळसंग यांच्या अंतर्गत शेड्याळ येथे २२१ जणाचे लसीकरण करण्यात आले.
शेड्याळ व प्राथमिक आरोग्य केंद्र वळसंग या दोन्ही गावांमध्ये ३ किलोमीटर अंतर आहे. यामुळे शेड्याळ गावातील ज्येष्ठ नागरिक व इतर लोक यांना लस घेण्याचं सोयीचं व्हावं म्हणून शेड्याळ गावातच गावातील नागरिकांना ग्रामपंचायतच्या वतीने लसीकरण कॅम्पंचे आयोजन केले.नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तब्बल २२१ नागरिकांनी लस घेतली.नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहता पुन्हा एकदा लस कॅम्पचे आयोजन करावे लागणार आहे.
ग्रामपंचायतच्या वतीने गावात लसीकरण संदर्भात जनजागृतीसाठी लाऊडस्पीकरवरुन दवंडी देण्यात आली होती. गावातील सर्व नागरिकांना लस घेण्यासंदर्भात आवाहन केले होते.या आवाहनाला शेड्याळकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अदाटे मॅडम,आरोग्य सेविका सुतार,आरोग्य सेवक चोले,आशा वर्कर सुनीता जाधव,अंगणवाडी सेविका मिनाक्षी हावगोंडी,अहिल्याबाई सातपुते,प्राथमिक शाळेचे शिक्षक बिराजदार यांच्या नियंत्रणाखाली लसीकरण पार पडले.
यावेळी सरपंच अशोक जाधव,ग्रामपंचायत सदस्य कर्यापा गुगवाड, भाऊसो जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी बिरू जावीर,नागनाथ कसबे या सर्वांनी मोहिमेत विशेष लक्ष देऊन ही लसीकरण पार पाडले.


संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर