
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
जत तालुक्यातील गुळवंची येथे श्रीकांत आप्पासो खरात (वय २२ वर्ष, रा.गुळवंची ता.जत) या तरुणाने बुधवारी सकाळी १० च्या सुमारास शेतातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात त्याचा भाऊ संभाजी आप्पासो खरात यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत श्रीकांत खरात हा सकाळी लवकर शेतात पिकास पाणी पाजण्यासाठी गेला होता. सकाळी दहाच्या दरम्यान मयत तरुणाचे काका शेतात पाण्याची मोटर चालू करण्यास गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला व त्यांनी लगेच पोलिसांना संपर्क साधला.
मयत तरुण हा अविवाहित व पदवीधर होता. शिक्षण चांगले असूनही नोकरी नाही, हे मयत तरूणाने मनास लावून घेतले असावे, त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या